अशी भिंतीवरची चित्रें रंगवण्याच्या कलेला उत्तेजन देण्यासाठी, तंजावूरमधल्या दक्षिण विभाग सांस्कृतिक केंद्राने, आपल्या 250 चौरस फुटांच्या भिंती, महाभारताची कथा चित्रित करण्यासाठी खुल्या केल्या आहेत. हे महाकाव्य कथारुपाने सांगणारे 21 चित्रफलक असतील. पहिल्या चित्रांत महर्षी वेदव्यास कथा सांगत असून श्रीगणेश ती लिहीत आहे असे चित्र असेल. शेवटल्या चित्रांत अठरा दिवसांच्या युद्धानंतर दुर्योधनाचा अंत असेल. या चित्रांसाठी वापरले जाणारे रंग नैसर्गिक असून झाडांचे खोड, पानें, फुलें, फळें आणि दगडांची पूड, यापासून बनवलेले आहेत. हे काम केरळमधल्या एका कुटुंबाकडे दिले आहे. वडील भिंतीवर मूळ रंग देतील, मुलगा चित्रें, रेखाटन करील, आणि त्याची आई त्यांत रंग भरणार आहे. |
|
|