शत्रुंजयने चलुकवर्माला त्या उंदराबरोबर दूर एका लहानशा घरात रहायला पाठविले व म्हणाला - ‘‘तू आमच्या बरोबर राहायला योग्य नाहीस. तुझ्या उंदीर वाहन असलेल्या गणपतीच्या भक्तीला योग्य अशी त्या वाहनाच्या जातीचीच तुला गृहिणी करून दिली आहे. तुझी गृहिणी ‘असूर्यंपश्या’ म्हणजे सूर्याचीही जिच्यावर नजर पडणार नाही अशा अंतःपुरात रहावी या साठी तुझ्या घरात उंदराची बिळे आहेत!’’ या शब्दांत त्याने हेटाळणी केली. चलुकवर्मा बाप म्हणाला ते ऐकून घेऊन शांत स्वरात म्हणाला - ‘‘वडिलांनी मुलांची लग्नें लावून देणे ही खरोखरच मोठी गोष्ट म्हणावयाची, नाही का? ज्याच्याशी जिचा संबंध व्हायचा असतो, हे म्हणे पूर्वीच लिहून ठेवलेले असते! आपल्या हातांत कांहीच नसते! सर्व त्या विघ्नहर्त्या गणनायकाची इच्छाच असते, नाही कां?’’ सर्व आपापल्या घरांना रंगरंगोटी करू लागले आणि धान्ये कांडू लागले. चुलुकानें रात्रीच्या रात्री सर्व उंदरांना बोलाविले. उंदरांनी रंगात शेपट्या भिजवून सर्व भिंती रंगवून काढल्या. आपल्या दातांनी भातावरची टरफले सोलून स्वच्छ तांदूळ तयार करून दिले. गणेश चतुर्थीच्या दिवशी उजाडताच चलुकच्या सर्व भगिनी सोन्याच्या घागरी घेऊन नदीवरून पाणी घेऊन आल्या. त्यांना पाहून चलुकला स्वतःची बायको पाणी आणूं शकणार नाही याबद्दल वाईट वाटले. |
|
|