शशांकपुरांत आदित्य आणखी दोन दिवस थांबला आणि तिसर्या दिवशी तो राजसभेंत गेला. त्याने महाराजांना आदराने वंदन केले आणि भर सभेंत ते हिरेजडित सुंदर कंकण त्याने महाराजांच्यासमोर ठेवले. ते बघून महाराजांना अतिशय आनंद झाला. त्यांचे डोळे समाधानाने चमकूं लागले. आश्चर्यचकित झालेल्या ...